Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘पुण्यात २२ जुलै रोजी राज्यस्तरीय कृषी व पशुधन प्रदर्शन’; मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 जुलै 2026 रोजी कृषी महाविद्यालय, पुणे  येथे राज्यस्तरीय कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शनाची सांगता होणार आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत.  हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि मूल्यवर्धित शेतीचा प्रभावी मेळावा ठरेल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

मंत्री भरणे म्हणाले, या प्रदर्शनात राज्यभरातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), कृषी उद्योजक, संशोधक, कृषी विद्यापीठे तसेच विविध शासकीय संस्थांचा सहभाग असेल. आधुनिक शेतीतील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, पूरक व्यवसाय, पशुधन विकास, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त नवकल्पनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा –  महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रदर्शनामध्ये कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, महाबीज, स्मार्ट प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, विविध शेतकरी उत्पादक संस्था, कृषी स्टार्टअप्स तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय यशस्वी शेतकरी, संशोधक आणि कृषी उद्योजक यांच्या सहभागातून विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.  आधुनिक शेतीच्या संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण, कृषी क्षेत्रातील नवोन्मेष, मूल्यसाखळी विकास, कृषी प्रक्रिया आणि ग्रामीण उद्योजकता याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष माहिती कक्ष उभारण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहितीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, असेही मंत्री भरणे म्हणाले.

कृषी महोत्वाच्यानिमित्ताने राज्यातील उत्कृष्ट शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांचा गौरव करण्यात येणार आहे, असेही मंत्री भरणे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button