Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता प्रात्‍यक्षिक परिक्षांसाठीही भरारी पथके; राज्‍य परीक्षा मंडळाचा निर्णय

मुंबई : राज्य परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इ. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर इ. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू आहेत. यंदा प्रथमच मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याकाढून भरारी पथकाला शाळांमधील प्रयोगशाळांची छायाचित्रे, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे छायाचित्रे काढून मंडळाला पाठवायची आहेत.

जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११६ तर दहावीच्या विद्यार्थ्यांची १८९ परीक्षा केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्राला पक्क्या भिंतीचे कुंपण, तेथील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि परीक्षेवेळी शाळा परिसरावर ड्रोनची ठेवली जाणार आहे. लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ (आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या केंद्रांवर नाहीत तेथे पर्यवेक्षक) असणार आहे.

तत्पूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेतही मंडळाने लक्ष घातले आहे. प्रत्येक शाळांवर जाणाऱ्या बहिस्थः परीक्षकांची नावे मंडळाकडूनच अंतिम केली जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी अचानक भेटी देणाऱ्या भरारी पथकामध्ये गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी असणार आहेत. इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक होण्यासाठीपर्यंत मंडळाने हे बदल केल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा –  ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता अनुदानित शाळांवरील शिक्षक बहिस्थः परीक्षक म्हणून खासगी स्वयं अर्थसहाय्यित शाळांवर जातील. स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक खासगी अनुदानित शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षा घेतील. लेखी परीक्षेत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असेल. तेथील पर्यवेक्षकाचे मोबाईल झूमद्वारे जोडले जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संनियंत्रण कक्षातून वरिष्ठ अधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवतील.

प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शाळांना भेटी देणाऱ्या भरारी पथकाने नेमकी काय माहिती पडताळायची, याचा नमुना राज्य परीक्षा मंडळाने दिला आहे. त्या शाळेत अद्ययावत लॅब आहे का, प्रयोगशाळेत प्रयोग होतात का, विद्यार्थ्यांनी जर्नल व्यवस्थित पूर्ण केली आहेत का, अशा बाबी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासायच्या आहेत. त्यानंतर त्याचे जीओ टॅग छायाचित्र मंडळाला पाठवायचे असल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले आहे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button