“संसदेवरील मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ!” सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश

नवी दिल्ली | पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल १८ जुलै रोजी जंतर मंतर येथे उपोषण करत असताना बळजबरीने उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे २० जुलै रोजीचा नियोजित संसदेवरील मोर्चा पुढे ढकलण्यात येणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी हा नियोजित मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असेल असंही त्यांनी म्हटलंय. याबाबतचा संदेश त्यांनी त्यांच्या पत्नीमार्फत पाठवल्याची एक्स पोस्ट कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.
“२० जुलै, स्वातंत्र्यासाठी दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत आणि अन्याय मुक्त भारत”, असा संदेश सोनम वांगचुक यांनी एका पेपरवर लिहिला आहे. पुढे असं लिहिलंय की, “पेपर लीकसारख्या अन्यायापासून स्वांतत्र्य आणि माझ्या बेयाकदेशीर अटकेच्या भीतापासून स्वातंत्र्य. भारताची दुसरं स्वातंत्र्य चळवळ, संसदेवर मोर्चा. कृपया हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा. “
Message from Sonam Sir:
20th JULY
आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारतFreedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention)India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big successSent through… pic.twitter.com/mdNqLiCA23
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 19, 2026
हेही वाचा
पश्चिम आशियात युद्ध पेटले! जॉर्डनमधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले
सोनम वांगचुक यांच्या पत्नीने आरोप केला आहे की त्यांचा सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला आहे, आणि त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी मागितली आहे. सकाळी ८.३० वाजताच्या ताज्या अपडेटनुसार, त्यांना व्हीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयात आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.
रुग्णालयाने सांगितलं की, वांगचुक यांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे डिहायड्रेशनची (शरीरातील पाणी कमी होण्याची) लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप शिफारस केलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी संमती दिलेली नाही. एम्सचे एक डॉक्टर उपचार करणाऱ्या पथकात सामील झाले आहेत आणि ते सतत देखरेख व क्लिनिकल व्यवस्थापनासाठी उपलब्ध राहतील.





