Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

पी. व्ही. सिंधूचा ऐतिहासिक पराक्रम! जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

PV Sindhu | भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहासाला गवसणी घातली आहे. जपान ओपन स्पर्धेतील अंतिम सामना भारताच्या पीव्ही सिंधू आणि जपानच्या अकाने यामागुची या दोन्ही खेळाडूंमध्ये पार पडला. या सामन्यात पीव्ही सिंधूकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. हा सामना तिने २१-१७, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये जिंकून जपान ओपनच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. यासह जपान ओपन स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅटमिंटनपटू ठरली आहे. या सामन्यात पीव्ही सिंधूकडून दमदार खेळ पाहायला मिळाला.

हा विजय पीव्ही सिंधूसाठी अतिशय खास आहे. कारण तिने पहिल्यांदाच सुपर ७५० च्या टायटलवर नाव कोरलं आहे. यासह ती ही स्पर्धा जिंकणारी पहिलीच महिला बॅटमिंटनपटू ठरली आहे. याआधी कुठल्याही भारतीय महिला बॅटमिंटनपटूला अशी कामगिरी करता आली नव्हती. याआधी तिने २०२४ मध्ये झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर बरेच महिने तिला जेतेपदाची वाट पाहावी लागली. अखेर जेतेपदाचा दुष्काळ जपानमध्ये जाऊन समाप्त झाला आहे. याआधी २०१९ मध्ये तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपवर नाव कोरलं होतं. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय होता.

हेही वाचा

इंग्लंडचा फ्रान्सवर ६-४ ने विजय; एमबाप्पेचा जागतिक फुटबॉलमध्ये नवा इतिहास!

आता २०२६ मध्ये तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. ज्या यामागुचीला तिने जपान ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये पराभूत केलं आहे, त्या यामुगीचीने पीव्ही सिंधूला अनेकदा पराभूत केलं आहे. पण तिच्यावर विजय मिळवण्याची संधी तिला मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यात मिळाली. जपान ओपन स्पर्धा जिंकून पीव्ही सिंधूने इतिहासाला गवसणी घातली आहे.

पीव्ही सिंधूची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी

या विजयासह पीव्ही सिंधूने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. हे पीव्ही सिंधूच्या कारकिर्दीतील पहिलेच BWF सुपर ७५० विजेतेपद आहे. गेल्या दोन वर्षांतील सिंधूचे हे पहिलेच मोठे BWF वर्ल्ड टूर जेतेपद ठरले असून, याद्वारे तिने आपल्या जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. भारताबाहेर मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी तिला ४ वर्ष वाट पाहावी लागली. ४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सिंधूने मोठे BWF विजेतेपद मिळवले आहे. सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी पीव्ही सिंधू ही पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button