breaking-newsमहाराष्ट्र

#Coronolockdown:जालन्यात अवैध विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

जालना : जालन्यात लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी आलेला विदेशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान तब्बल पावणेअकरा लाखाची विदेश दारु आणि 4 लाखाचा पिकअप टेम्पो, असा पावणेपंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालन्यातील मंठा चौफुली भागात पुष्कनगरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या वाचक शाखेने मध्यरात्री ही कारवाई केली. यावेळी दारुसाठ्याने भरलेला पिकअप टेम्पो सोडून चालक पसार झाला आहे.

त्याशिवाय 4 लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 14 लाख 79 हजाराचा ऐवज पोलिसांनी केला जप्त केला आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊनचा तिसरा भाग 4 मेपासून लागू झाला. यादरम्यान लॉकडाऊनचे नियम शिथील करत रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व भागातील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर हा दारुचा साठा अवैधरित्या जालन्यात आणला जात होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button