breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांची राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर स्वाक्षरी

लंडन | ब्रिटीश शाही घराण्यापासून वेगळे झाल्यानंतर काल पहिल्यांदा प्रिन्स हॅरीनं याबाबत मौन सोडलं आहे. आपल्याला महाराणीची आणि देशाची सेवा करायची होती. पण सार्वजनिक निधीचा वापर करायचा नव्हता आणि त्यासाठी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागला असं स्पष्टीकरण प्रिन्स हॅरीनं दिल आहे. तरी, प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कल यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर आता स्वाक्षरी केली आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेघन या दोघांनी ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ या उपाधीही सोडल्या आहेत. त्यामुळे आता दोघांनाही सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आता हे दाम्पत्य ब्रिटनच्या महाराणीचं अधिकृतरित्या प्रतिनिधीत्व करणार नाही. या दोघांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी निर्णयाला पाठिंबा देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रिटन आणि संपूर्ण राष्ट्रमंडळासाठी केलेल्या कामांबद्दल जोडप्याचे आभार त्यांनी आभार मानले आणि स्वंतत्र जीवन जगण्याच्या त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला. ब्रिटनच्या राणी एलीझाबेथ म्हणाल्या, ‘हॅरी, मेगन आणि आर्ची आमच्या परिवाराचे कायम प्रिय सदस्य आहेत. मेगनचा मला अभिमान वाटतो. तीने लवकर कुटुंबाला आपलस करून घेतले. तसेच या दाम्पत्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button