breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

सुरक्षा परिषदेच्या अस्थाई सदस्यपदी भारताची 8 व्यांदा निवड

न्यूयॉर्क | भारत 8 वर्षांमध्ये आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला आहे. बुधवारी झालेल्या वोटिंगमध्ये महासभेच्या 193 देशांनी सहभाग घेतला. 184 देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अस्थाई सदस्यत्त्वाचे स्वागत केले आहे. अमेरिकेने म्हटले की, जगातील शांतता आणि सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका एकत्र काम करतील.  संयुक्त राष्ट्र चार्टरनुसार, भारत दोन वर्षांसाठी अस्थाई सदस्य म्हणून निवडला गेला आहे. भारतासोबतच आयरलँड, मॅक्सिको आणि नॉर्वेही अस्थाई सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.

हा संबंधांचा विस्तार भारताला अस्थाई सदस्य बनवण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले होते की, “आम्ही भारताचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. जगातील शांतता पूर्वस्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर दोन्ही देश एकत्र काम करतील. दोन्ही देशांमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. आम्हाला हे आणखी पुढे नेण्याची इच्छा आहे.”

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात भारताला अस्थाई सदसत्य मिळाल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. मतदानापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले- यूएनएससीमध्ये भारताचे अस्थाई सदस्यत्व आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. या व्यासपीठावरून उठविण्यात येणारे प्रस्ताव भारताने नेहमीच नाकारले आहेत. भारत अस्थाई सदस्य झाल्यानाही असेही काही विशेष होणार नाही. पाकिस्तानदेखील सात वेळा तात्पुरता सदस्य झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button