breaking-newsराष्ट्रिय

#Waraginestcorono:भारतात कोरोना रॅपिड टेस्ट स्ट्रिप विकसित

नवी दिल्ली – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) प्रयोगशाळेने सर्वांसाठी खुशखबर आणली आहे. कोरोना व्हायरसची रॅपिड टेस्ट करणारी पेपर स्ट्रिप विकसित केली आहे. सत्यजित राय यांनी ही स्ट्रिप विकसित केली आहे. ‘फेलुदा’ असं या पेपर स्ट्रिपचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे किट विकसित करण्यासाठी सीएसआयआर प्रयोगशाळेने मंगळवारी टाटा अॅन्ड सन्सशी यांच्याशी हातमिळवणी केली. या मे महिन्याच्या अखेरीस हे किट वापरण्या करता उपलब्ध होईल अशी माहिती सीएसआयआरने दिली आहे.

‘फेलुदा’ हा संपूर्ण स्वदेशी वैज्ञानिक शोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगाने कोरोना चाचणी करण्यास उपयुक्त आहे. याचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही टेस्ट अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. परिणामी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांच्या कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यापूर्वीच कोरोना रॅपिड चाचणीला केंद्राने परवानगी दिली होती. मात्र, चीन वरुन मागवण्यात आलेल्या किटमध्ये काही त्रुटी आढळल्याने हा निर्णय लाबणीवर पडला होता. मात्र, आता हे किट विकसीत झाल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात मदत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button