ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…

पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर!

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर टीका केली होती. “पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार” असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण असं व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये, ही भूमिका काही योग्य होणार नाही”, असे भाष्य शरद पवार यांनी केले.

मोदींबद्दलची आस्था आता कमी होत आहे
“पंतप्रधान मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्या अमलात आलेल्या नाहीत. पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात. पण सरकारला ते करणं झेपेल की नाही? सरकारची तशी स्थिती आहे की नाही? याचा यत्किचिंतही विचार ते करत नाहीत, म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर मोदींनी टीका-टिप्पणी केली होती. पण आज तेच निर्णय मोदी राबवत आहेत. त्यांचातला हा विरोधाभास लोकांना दिसत आहे. लोक आता डॉ. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींच्या दहा वर्षांची तुलना करत आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट होतं की, ते कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे. मोदी साहेबांचा रिझल्ट माहीत नाही, पण टीका-टिप्पणीतच त्यांचा फार वेळ जातो. लोकांना आता हे सर्व कळायला लागले आहे”, असेही शरद पवार म्हणाले.

ती वेळ उद्धव ठाकरेंवर येऊ नये
पंतप्रधान मोदी यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखीतत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरही भाष्य केले होते. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. ते जेव्हा अडचणीत येतील, तेव्ही त्यांच्या मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असेही मोदी म्हणाले होते. यावर शरद पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मोदींनी लाख काहीही म्हटलं असलं तरी आमची प्रार्थना असेल की, उद्धव ठाकरेंना यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये.”

निकालापर्यंत भाजपाचा आकडा अजून खाली येईल
भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाची दमछाक होत आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत, असाही प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, भाजपाने आता आपला आकडा खाली आणला आहे. निवडणुकीच्या निकालापर्यंत थांबा भाजपाचा आकडा आणखी खाली आलेला दिसेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button