breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Whatsapp वर येणारे फेक मेसेज ओळखण आता ‘या’ फिचरद्वारे शक्य

सोशल मीडियातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग एप म्हणून Whatsapp ओळखलं जातं. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यासह अन्य मेसेजिंग एपच्या तुलनेत Whatsapp ला जास्त पसंती आहे. दिवसभरात लाखो मेसेज फॉरवर्ड केले जातात. काही जण जाणीवपूर्वक चुकीचे मेसेजही फॉरवर्ड करतात. हेच चुकीचे मेसेज किंवा फेक मेसेज ओळखून त्यावर आळा घालण महत्त्वाचं आहे..तर हे फेक मेसेज ओळखण्यासाठी एक नविन फिचर तयार केलं जात आहे…

ग्रुपवर किंवा पर्सनलवर आलेला Whatsapp वर आलेला मेसेज फेक आहे की खरा आहे, हे बऱ्याचदा समजत नाही. परंतु, Whatsapp ने आता फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी एक नवीन फीचर आणण्याचे ठरवले आहे. ही फीचर सध्या युजर्सद्वारे टेस्ट केले जात आहे. हे नवीन फीचर लाँच झाल्यास Whatsapp वर आलेला फॉरवर्डेड मेसेज सहजपणे या अॅपने क्रॉसचेक करता येवू शकणार आहे.

या अॅपच्या मदतीने युजर्सला तत्काळ कळेल की, Whatsapp वर आलेला मेसेज फेक आहे की नाही…चला तर मग जाणून घेवूयात व्हॉट्सअॅपवरील येणाऱ्या या आगामी नवीन फीचरविषयी….

फॉरवर्ड करण्यात आलेला मेसेज तपासण्यासाठी या मेसेजच्या बाजुला एक मॅग्निफाइंग ग्लास आयकॉन युजर्संसाठी देण्यात आला आहे. या आयकॉनवर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्स चेक करू शकतील की वारंवार पाठवण्यात आलेला हा मेसेज फेक आहे की नाही. फेसबुकची मालकी असलेली व्हॉट्सअॅप कंपनी कडून अॅपच्या बिटा चॅनेलवर ही फीचर हळू हळू रोलआउट करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात अनेक बिटा युजर्संना हे नवीन फीचर्स मिळाले आहे. या फीचरची चाचणी केल्यानंतर हे अॅप सर्व युजर्संसाठी स्टेबल अपडेट करण्यात येवू शकते.

युजर्संना हा मेसेज चेक करायचा असेल तर मॅग्निफाइंग ग्लास आयकॉनवर टॅप करावे लागणार आहे. यानंतर व्हॉट्सअॅपवर एक पॉप अप दिसेल. ज्यावर लिहिले असेल, तुम्हाला वेब सर्च करायचे आहे का?, यासाठी हा मेसेज गुगलवर अपलोड होईल. युजर या ठिकाणी प्रोसेस कॅन्सल करू शकतात. किंवा ‘Search Web’या बटनावर क्लिक करून सर्च करू शकतात. या फीचरला ट्विटर युजर Shrinivas G यांनी पाहिले आणि या संदर्भात ट्विट केले. त्यांनी लिहिलेय, याप्रमाणे मेसेज गुगलवर सर्च केला जावू शकतो आणि फेक मेसेज किंवा फेक बातमी सहजपणे ओळखली जावू शकते.

हे फीचर आल्यानंतर मेसेजला कॉपी आणि पेस्ट करून गुगलवर सर्च करावे लागणार नाही. ही प्रोसेस युजर्संसाठी सोपी करण्यात आली आहे. ज्या लोकांना व्हायरल फॉरवर्ड्सला फॅक्ट चेक करायचे आहे. परंतु, मोठी प्रक्रिया असल्याने ते करीत नाहीत. करोना व्हायरस पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठा वापर करण्यात येत आहे. काही लोकांसाठी ही माहिती प्राथमिक सोर्स बनली आहे. अशा वेळी फेक मेसेजला रोखण्यासाठी कंपनीसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे हे फीचर फेक न्यूज रोखण्यासाठी फार उपयुक्त ठरेल, असे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button