breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी‐चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करा: मंगला कदम

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहरात जोगाजागी विशेषत: जिथे कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, तिथे कुत्र्यांचा वावर जास्त आहे. भटकी कुत्री टोळीने वावरत असल्यामुळे रस्त्यावरुन जाणा-या पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे प्रसंगी अपघात होऊन नागरीक जखमी होतात. तसेच सकाळी मार्निंग वॉकला जाणारे जेष्ठ नागरीकांच्या अंगावर धावून त्यांना जखमी करतात त्यामुळे भटक्या कुत्रांबाबत नागरीकांमध्ये दशहत पसरली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्यांचा बंदोबस्त करावा आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी मा. महापौर मंगला कदम यांनी महापाालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारेेे केली आहे.

निवेदनात पुढे कदम म्हणाल्या, चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रीया करुन त्यांना त्यांच्या जुन्या अधिवासात सोडण्यात येते. त्या अनुषंगाने मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दोन खाजगी संस्था नेमून त्यांच्यामार्फत भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रीया केली जाते व कुत्रांना त्यांच्या जुन्या अधिवासात सोडले जाते.  परंतु संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या खाजगी संस्था नक्की काम करतात का ?  याबाबत संशय निर्माण होत आहे. तसेच मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी हे कामात हलगर्जीपणा करीत आहेत त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी व ज्या संस्थांना हे काम दिले आहे, त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. व यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच  या संस्था खोटी माहिती अथवा दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी मा. महापौर मंगला कदम यांनी महापाालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारेेे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button