breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी ३ टक्के महागाई भत्ता वाढणार
नवी दिल्ली– केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. याचा फायदा ५५ लाख कर्मचारी आणि सुमारे ६० लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच त्यांची दिवाळी होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे हा महागाई भत्ता २८ वरून ३१ टक्के होणार आहे. यामुळे कर्मचार्यांच्या पगारात २० हजार ४०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकेल, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळणार असल्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.