breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात संचारबंदी दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार ? ‘आढावा’

मुंबई | महाईन्यूज |

महाराष्ट्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहून तसेच लोकांना वारंवार गर्दी टाळण्याचं किंवा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करून सुद्धा काही प्रमाणात लोक या आवाहनाला गांभिर्यानं घेत नसल्याचं दिसून आलं..त्यामुळे अखेर कोरोना व्हायरसचा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आज म्हणजे 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात 144 कलम लावले होते. त्यामुळेच आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संचारबंदीच्या या काळात काय काय सुरु राहणार आणि काय काय बंद राहणार हे जाणून घेऊयात…

काय काय सुरु राहणार?

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
  • औषधांची दुकानं
  • किराणाची दुकानं
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
  • दवाखाने, रुग्णालयं
  • बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था
  • वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयं
  • रिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)
  • कृषीमालाशी सबंधित वाहतूक
  • रेल्वेतील मालवाहतूक

काय काय बंद राहणार?

  • नागरिकांचा प्रवास
  • मुंबईची लोकलसेवा
  • जिल्ह्यांच्या सीमा
  • राज्यातील सीमा
  • परदेशातून येणारी वाहतूक
  • धार्मिक प्रार्थना स्थळे
  • खासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)
  • शाळा, महाविद्यालयं
  • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं

यावरुनच अत्यावश्यक असणाऱ्या सेवा वगळता त्याव्यतिरिक्तच्या सर्व सेवा संचारबंदीच्या काळात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button