पिंपरी / चिंचवड

चाकण परिसरात दोन अपघात ; दोघांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण परिसरात अपघाताच्या दोन घटना घडल्या. या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 19) चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताची पहिली घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊ वाजता कुरुळी येथे घडली. बंधन झिमरी मुंडा (वय 36, रा. कुरुळी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वेगेल बाबू लामा (वय 22, रा. कुरुळी) यांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी पुणे नाशिक रोडवर आले असता एका अज्ञात वाहनाने बंधन मुंडा यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडा यांचा मृत्यू झाला.

अपघाताची दुसरी घटना शनिवारी (दि. 19) पहाटे साडेतीन वाजता चाकण शिक्रापूर रोडवर बहुळ येथे घडली. कमलेश कुमार यादव (वय 25, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिवशंकर हरिराम यादव (वय 30, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा अशोक खेडकर (वय 26, रा. वडाचीवाडी, ता. शिरूर, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत कमलेश हा फिर्यादी यांच्या ट्रकवर काम करत होता. तो शनिवारी पहाटे चाकण-शिक्रापूर रोडने ट्रक घेऊन जात असताना बहुळ गावच्या हद्दीत आरोपी कृष्णा हा ट्रक घेऊन आला. कृष्ण याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रक चालवला आणि कमलेश चालवत असलेल्या ट्रकळा धडक दिली. यामध्ये कमलेश याचा मृत्यू झाला आणि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button