breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

अर्थक्रांती जीवन गौरव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख यांचा पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल

ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेत जाणार - विजय देशमुख

पुणे | प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकास राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा; केंद्रात व राज्यात ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करावे, ज्येष्ठांना अन्यायापासून संरक्षण मिळवण्यासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा असावा आणि कोणताही भेदभाव न बाळगता दहा हजार रुपयाची पेन्शन चालू करण्यात यावी या व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या इतर मागण्यांकरिता, अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाच्या अंतर्गत अपक्ष म्हणून विजय देशमुख यांनी आज १८ व्या लोकसभेसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अर्थक्रांती जीवनगौरव अभियानचे पदाधिकारी आणि उमेदवार विजय देशमुख दबडगावकर यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी करणारे भगवान कोठावळे, दिलीप पवार, संजय जोशी, किशोर जगदाळे, श्रीकांत तोडकर, श्रीमती वंदना डांबरे,गोविंद धडफळे, पोपट कांबळे, जोसेफ साखरे उपस्थित होते.

हेही वाचा     –    शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, न्यायालयाचे निर्देश 

पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी विजय देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज स्वीकारला आणि दाखल करुन घेतला. विजय देशमुख दबडगावकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिक संघटना, घरगुती कामगार संघटना नेते यांनी स्वागत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button