पिंपरी / चिंचवड

लिव्ह एंड लायसन्स कराराने सदनिका ताब्यात घेऊन सव्वादोन लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

लिव्ह एंड लायसन्स या करारानुसार सदनिका ताब्यात घेऊन एका व्यक्तीने सदनिका मालकाची दोन लाख 25 हजार 910 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल 2020 ते 19 मार्च 2022 या कालावधीत आळंदी येथे घडला.

मिलिंद वसंत भामरे (वय 53, रा. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अमितकुमार पंकजकुमार शर्मा (वय 42, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेव्हणे शरदकुमार शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांची सदनिका आरोपी भामरे यांनी  एप्रिल 2020 पासून लिव्ह एंड लायसन्स या करारानुसार ताब्यात घेतली. त्यानंतर त्याचे भाडे न देता शरदकुमार शर्मा यांची दोन लाख 25 हजार 910 रुपयांची फसवणूक केली. तसेच सदनिकेला कुलूप लाऊन मालकाला व फिर्यादी यांना सदनिकेत येण्यास प्रतिबंध केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button