breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शासकीय भूखंड विक्री प्रकरण ? : भोसरीतील भाजपाच्या मातब्बर नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी / महाईन्यूज

शासकीय भूखंड विक्री प्रकरणात भोसरी विधानसभेतील भाजपाच्या एका मातब्बर नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजते. संबंधित नगरसेवकाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा शासकीय भूखंड विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणात चौकशी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आल्याची खात्रीशिर माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणतीही गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. संबंधित नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे सदस्य होते. शहर सुधारणा समितीचे सभापती पद देखील त्यांनी भूषवले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button