breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने खासदार होतील’; उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे : महायुतीच्या जागावाटपात मावळ लोकसभा कोणाकडे जाणार हे आद्यप ठरले नाही.  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक प्रकारे बारणे यांची उमेदवारी घोषित केली. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासारखी व्यक्ती खासदार होणे ही काळाची गरज आहे. दीड महिन्यानंतर श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, देशाच्या संसदेत अशा व्यक्तींची गरज आहे. उद्या लोकसभा निवडणूक प्रचाराला मला त्यांनी बोलावले तरी मी नक्की येईल. मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी पाठपुरावा केला.

हेही वाचा – प्राधिकरण परतावा : निवडणुकीच्या तोंडावर घोषणा म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक!

पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाबद्दल बारणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. यापूर्वी अनेकजण येऊन गेले त्यांचा दृष्टीकोन काय होता माहित नाही, पण बारणे यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वीच या विषयावर महापालिकेत बैठक घेतली. आम्ही या प्रकल्पासाठी तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च करतोय. आता त्या कामाचा डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्याचे टेंडर होईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button