breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हिंजवडीतील हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा, मुलींचे केले चित्रिकरण

पिंपरी |महाईन्यूज|

हिंजवडीतील एका उच्चभ्रू हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोसिलांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू हॉटेल बी हाईव्ह रेस्टराँच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला. कॅमेरा ऑन होता. आरोपी रॅम देब नाथ याने हा कॅमेरा बसवला होता. हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलींचे चित्रिकरण करण्याचा आरोपीचा हेतू होता. हॉटेल व्यवस्थापक राकेश शेट्टी (वय-35, रा.102, इंगळे, कॉर्नर, कर्वे नगर, पुणे.) यांनी दिलेल्या तक्रारीवरून

आरोपी रॅम देब नाथ वय-24, रा.श्रद्धा फॅसिलिटी सर्व्हिसेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे.) याच्या विरोधात भादंवि कलम 511 आणि आयटी अॅक्ट कलम 72 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी रॅम देब नाथ हा हाऊस किपिंग म्हणून काम करत होता. त्याने लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण केले आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button