breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध

पुणे : पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणे शहरात त्यांची चारही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार सभा होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान अवकाश उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात…’; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ आणि ३० एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता कलम  च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button