breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार गटात आज ३ मोठे पक्षप्रवेश होणार? ते तीन नेते कोण?

पुणे | शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार गटाचे नेते आमदार निलेश लंके, वसंत मोरे आणि भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार व विखे कुटुंबीयात राजकीय पूर्व वैमनस्य आहे. त्यातूनच विखे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी पवार निलेश लंके यांना आपल्या पक्षात घेणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा     –    Ranji Trophy | मुंबईने विक्रमी ४२ व्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी दोन दिवसांपुर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन असं ते राजीनामा देताना म्हणाले. त्यातच आता वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button