breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मावळमध्ये महायुतीला मोठे मताधिक्य चिंचवडगावातून मिळवून देणार; भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पिंपरी : मावळ मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नमो संवाद कॉर्नर सभा मावळ लोकसभा मतदार संघात सुरू झाल्या आहेत. महायुती मधील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, रासप व इतर मित्र पक्षांचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग १८ चिंचवडगावात ‘नमो संवाद’ कॅार्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीला मोठे मताधिक्य चिंचवडगावातून मिळवून देऊ असा निर्धार भाजपा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केला.

देशाचे कर्तृत्ववान व लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामे, योजना व प्रकल्प यांची माहिती जनतेला व्हावी याकरिता संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नमो संवाद कॅार्नर सभांचे आयोजन केले जात आहे. चिंचवडगावातील वेताळनगर शिवसेना शाखा, महात्मा फुले उर्दू शाळा, श्रीमन् महासाधू मोरया गोसावी क्रिडागंण केशवनगर व काकडे पार्क गणेश मंदिर या ठिकाणी ‘नमो संवाद कॅार्नर सभा’ मोठ्या उत्साहात पार पडल्या.

हेही वाचा – ‘माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात…’; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

यावेळी प्रमुख वक्त्या म्हणुन भाजपा पिंपरी चिंचवड शहर प्रभारी ॲड. वर्षा डहाळे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या सर्व नमो संवाद कॅार्नर सभा यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक १८ चिंचवड मधील भाजपा प्रदेश सदस्य व माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, मधुकर बच्चे, योगेश चिंचवडे, धनंजय शाळिग्राम, रविंद्र देशपांडे, उज्वला गावडे, नूतन चव्हाण, रविंद्र प्रभुणे, संतोष निंबाळकर, प्रशांत आगज्ञान, पल्लवी पाठक, दिपाली कलापूरे यांनी प्रयत्न केले.

यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात येणार, महायुती विजयी होणार, चिंचवडगावातून सर्वाधिक मतदान श्रीरंग बारणे यांना मिळणार असा निर्धार व्यक्त केला आहे. या नमो संवाद सभेत महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना विद्यार्थी सेनेचे प्रदेश पदाधिकारी विश्वजीत बारणे, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, शिवसेना उपशहर प्रमुख राजेश आरसूळ, मनसे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे यांनी देखिल उपस्थितांशी संवाद साधला.

या सर्व नमो संवाद कॅार्नर सभांना चिंचवडकर नागरिक उस्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button