breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्र्यांवर कोणाचाही दबाव नाही- संजय राऊत

मुंबई –  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे स्वकीयांकडूनही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वाचा :-वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर संजय राठोड अधिवेशनाआधी राजानामा देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं असून त्याद्वारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं ट्विट केलं आहे.

शिवसेना खासदार राऊत यांनी ‘सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन’ असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला. त्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी संजय राठोड यांना एक प्रकारे सूचक इशारा दिला जात असल्याची चर्चा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button