breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

काही दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार- किरीट सोमय्या

मुंबई |

सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखचा घरी आज ED ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

तसेच, ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्ट अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल. असंही किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button