breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके पंढरपुर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रचारार्थ दाखल…

● आमदार शेळके करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा प्रचार.

पंढरपुर |

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. दोन्ही बाजूने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीस चुरस वाढली आहे. ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना तिकिट दिले आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपाने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामूळे एकतर्फी वाटणा-या या निवडणूकीत रंग भरले आहेत.

मात्र, निवडणूक जरी पंढरपुर-मंगळवेढ्याची असली तरी भाजपने मतदारसंघाबाहेरील अनेक नेते मंडळीना प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना निवडणूक प्रमुख केले आहे. त्यामूळे राष्ट्रवादीच्या गोटातून भेगडे यांना ९० हजार हून अधिक मतांनी पराभूत केलेले लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांना प्रचाराकरिता बोलवावे अशी मागणी सुरु होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मातब्बर आमदार सुनिल शेळके यांना मैदानात उतरविले आहे. त्यामूळे मावळकरांची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे.

महाराष्ट्रभर प्रचंड क्रेझ असलेले आमदार सुनिल शेळके हे पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात गावभेट दौरे, कॅार्नरसभा, मोठ्या सभा, युवक मेळावे व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा संभाळणार आहेत. शेळके यांना मानणारा मोठा चाहता तरुणवर्ग महाराष्ट्रसह या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर आहे. तेंव्हा, सुनिल शेळकेंच्या झंझावती प्रचार दौ-यामूळे राष्ट्रवादीचा भगिरथ विजयीरथ घेऊन विधानसभेत नक्कीच जाईल अशी येथील मतदारांची भावना होत आहे.

वाचा- घरी परतणाऱ्या मजूर महिलेची रस्त्यात प्रसूती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button