breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर
मुंबई | राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून काल रात्रीपासून आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह पाच शहरांतील रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.राज्यात काल रात्रीपासून वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे.
या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.