breaking-newsटेक -तंत्र

मायक्रोसॉफ्ट कंपनीतून २५ कोटी युजर्सचा डेटा लीक…

सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रथम स्थानावर असणाऱ्या  मायक्रोसॉफ्ट कंपनीतून २५ कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने या माहितीला दुजोरा दिला आहे. ‘बॉब डियाचेंको’ यांच्या कॉम्प्रिटेक सेक्युरिटी रिसर्च टीमने ही बाब उजेडात आणली आहे.


मायक्रोसॉफ्टच्या युजर्सचे ई-मेल, संपर्क क्रमांक आणि व्यवहार पूर्ततेसंदर्भातील माहिती लीक झाल्याचे रिसर्चर्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हा डेटा ‘प्लेन टेक्स फॉरमॅट’मध्ये लीक झाला असून, ग्राहकांचे ई-मेल, आयपी अड्रेस, लोकेशन्स, मायक्रोसॉफ्ट सपोर्टचे ई-मेल  , ग्राहक नोंदणी क्रमांक, अंतर्गत सिक्रेट नोट्स आदी डेटा लीक झाल्याची माहिती मिळाली आहे.

२१ जानेवारी रोजी मायक्रोसॉफ्टकडून एक ब्लॉग प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती देण्यात आली होती. मायक्रोसॉफ्टच्या सायबर सेक्युरिटी सोल्यूशन्सचे समूह अधिकारी व्ही. पी. एन. जॉनसन यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. जॉनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टमधून लीक झालेल्या माहितीचा गैरवापर झाल्याचा प्रकार अद्यापपर्यंत उघडकीस आलेला नाही. ग्राहकांची वैयक्तिक माहिती असलेला डेटा लीक झालेला नाही. या प्रकरणी पारदर्शकता असावी, यासाठी डेटा लीक झाल्याची माहिती युजर्सना देत आहोत, असे जॉनसन यांनी म्हटले आहे.

५ डिसेंबर २०१९ रोजी कंपनीच्या सेक्युरिटी ग्रुपने सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले होते. या बदलांमुळे डेटा लीक झाली. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असून, युजर्सचा डेटा सुरक्षित राहील, याबाबत अधिक काळजी घेतली जात आहे, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button