breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: काँग्रेसचे आमदार अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन

नांदेड |

काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनानं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. करोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाचं निदान झालं होतं.

स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे आमदार अंतापूरकर यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आलं होतं. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून माहिती दिली. “माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

वाचा- संकेतस्थळाच्या आडून वेश्या व्यवसायात ढकलणारी टोळी जेरबंद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button