breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगेंची पदयात्रा आज पुण्यात; जाणून घ्या वाहतूक बदल

पुणे | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेली पदयात्रा आज (२३ जानेवारी) पुण्यात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि लाखोंच्या संख्येने समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत. त्यानिमित्तान वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगे पाटील आज दुपारचे भोजन भीमा कोरेगाव येथे करतील. तर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून मनोज जरांगे २६ जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर टप्याटप्याने वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जातील. वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

हेही वाचा    –    Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी दोन तास वाहतूक ब्लॉक

बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. तेथून पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. थेऊर फाटा, केसनंद, थेऊरमार्गे वाहतूक सोलापूर रस्त्याने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वाघोली परिसरातील वाहतूक वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवा चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक येरवड्यातील चंद्रमा चौक, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे वळविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button