breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

घरी परतणाऱ्या मजूर महिलेची रस्त्यात प्रसूती

वसई |

करोनामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मजुरीसाठी आलेल्या मजुरांनी आपला घरचा रस्ता धरला आहे. त्यातीलच एक मजूर महिला आपल्या डहाणू येथील मूळ गावी पायी परतत असताना बुधवारी सकाळी ११ सुमारास वसईतील शिरसाड नाका येथे रस्त्यातच प्रसूती झाली आहे. डहाणू चारोटी येथील एक दाम्पत्य स्थलांतर होऊन मोलमजुरीसाठी भिवंडी तालुक्यातील लाखिवली येथे आले होते. टाळेबंदीमुळे ते शिरसाडमार्गे घरी परतत होते. याच दरम्यान मजूर दाम्पत्यातील निर्मला रणजित कांबडी (३०) या गरोदर महिलेला शिरसाड नाका येथे प्रसूती वेदना सुरू झाल्या.

हा प्रकार नाक्याजवळच्या नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या जाणत्या महिलांना बोलावून निर्मलाजवळ पाठवले. लागलीच रुग्णवाहिकेला पाचारण केले होते. तोपर्यंत महिलेची प्रसूती झाली होती. जागरूक नागरिकांनी तिला पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आता बाळ व आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती पारोळ आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती पिल्लेवार यांनी सांगितले आहे.

वाचा- धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button