ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड रेल्वे स्टेशनजवळील पाच दुकानांना आग, चार बंब घटनास्थळी दाखल

पिंपरी चिंचवड | चिंचवड रेल्वे स्टेशन जवळील पाच दुकानांना आग लागली आहे. पत्राशेडची असलेली ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले तरीही अजून आग धुमसत असल्याने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार ते पाच दुकांनाना अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. 1.45 वा चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली आहे, तरीही काही ठिकणी आग अजून धुमसत असल्याने जवान ती विझविण्याचा प्रयत्न करत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button