breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: किंग्ज इलेव्हनवर राजस्थानचा दणदणीत विजय

दुबई – राजस्थानकडून बेन स्टोक्सने ५० तर संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी करत किंग्ज इलेव्हनचा पराभव करत त्यांचा विजयरथ रोखला. १८६ धावांचं आव्हान राजस्थानने ३ गडी गमावत पूर्ण केलं असून हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता.

राजस्थान रॉयल्ससमोर १८६ धावाचं आव्हान होतं. त्यांची सुरुवातही दमदार झाली होती. सलामीवीर बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा यांनी पहिल्या षटकापासूनच पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत फटकेबाजीला सुरुवात केली. बेन स्टोक्सने आक्रमक पवित्रा आजमावत २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. ही जोडी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच स्टोक्स जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर सॅमसन आणि उथप्पा यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर राजस्थानचा संघ स्थिरावतोय असं वाटत असतानाच मुरगन आश्विनने उथप्पाला माघारी धाडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. उथप्पाने ३० धावा केल्या.

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपला स्पर्धेतला आतापर्यंतचा चांगला फॉर्म कायम ठेवत पहिल्याच षटकात पंजाबच्या मनदीप सिंहला माघारी धाडलं. मात्र यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला उत्तम साथ देत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोन्ही फलंदाजांनी राजस्थानच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उचलत चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरुन ख्रिस गेलने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलंच दडपणात आणलं. ख्रिस गेलने या दरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी करत सामन्यावर वर्चस्व राखलं. लोकेश राहुलही आपलं अर्धशतक पूर्ण करणार असं वाटत असतानाच बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. राहुलने ४६ धावांची खेळी केली.

यानंतर मैदानात आलेल्या निकोलस पूरनने ख्रिस गेलला उत्तम साथ देत धावांची गती कमी होणार नाही याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत पंजाबची धावसंख्या कमी राहणार नाही याची काळजी घेतली. निकोलस पूरन बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर ख्रिस गेलने अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. परंतू शतकापासून अवघी १ धाव दूर असताना गेल आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button