breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यंदाही शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार – माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजंयतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आम्हीही उपस्थितीत होतो. तरीही यंदाच्या वर्षी शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. १२ मार्चला शिवसेनेच्या वतीने उत्साहात शिवजयंती साजरी केली जाईल, असे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीच्या निमित्ताने नुकतीच शिवनेरी किल्ल्यावर राज्य सरकारच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडी सरकारमधील अन्य नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. शिवसेनेचा तारखेनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याला कायम विरोध राहिला आहे. हिंदू कँलेंडरनुसार मार्चमध्ये शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते.

शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवजयंती ही तिथीनूसार साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 12 मार्चला पुन्हा शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

दरम्यान, १९९५ मध्ये  सेना-भाजपच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवजयंतीच्या तारखेचा वाद मिटवण्यासाठी इतिहासकार आणि अभ्यासकांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने १९ फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असा अहवाल सादर केला होता. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय लागू केला होता.   

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button