TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

बापल्योकफेम अभिनेते विठ्ठल काळे यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीतील मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटला दिली भेट..!

पिंपरीः बहुचर्चित मराठी चित्रपट बापल्योकचा लेखक आणि चित्रपटात मुलाची दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या विठ्ठल काळे या हरहुन्नरी अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्ताने पिंपरी मधल्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशन आणि जर्नलिजम या संभाजीनगर मधल्या विभागाला भेट दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी “बाप” ही आपल्या आयुष्यातील किती महत्त्वाची व्यक्ती आहे याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून देतानाच आज मी जे काही आहे तो बापामुळे असल्याची भावना त्याने व्यक्त केली. हा चित्रपट लिहल्यानंतर माझे आणि वडिलांचे संबंध आणखी घट्ट झाल्याची भावना ही त्याने व्यक्त केली. हा चित्रपट तुम्हाला तुमचा वाटेल, तो तुमचाच आहे हे सांगताना प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहावा असे आवाहन त्याने केले. या वेळी विठ्ठल काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद ही साधला.
चित्रपट बनवत असताना लिखाण ते शूटींग आणि परत डिस्ट्रीब्यूशनच्या काळात येणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल विठ्ठल काळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विठ्ठल काळे यांनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिजमच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत ही केले.

या कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, दत्तात्रय हिंगणे, दत्तात्रय बिडबाग, प्रतीक पाटमासे उपस्थित होते. या वेळी बोलताना प्राचार्य सरोदे यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजची माहिती देतानाच मास कम्युनिकेशन अँड जर्नलिजम हा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे, त्यात चित्रपट निर्मिती बद्दल ही अभ्यास आहे, त्यामुळे पुढे जावून तुमच्यातला ही एखादा विद्यार्थी विठ्ठल काळे प्रमाणे यश मिळवेल आणि तो प्रमुख पाहुणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button