breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग व पिंपरी चिंचवड अँड बार असोसिएशनच्यावतीने लसीकरण मोहीम

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग यांच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड अँड बार असोसिएशनच्या उत्तम सहकार्याने पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात वय वर्ष १८ च्या पुढील सर्व वकील बंधू भगिनिंचे व न्यायालयीन कमँचारी यांची लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.त्यामध्ये साधारणतः 249 वकिल बंधू व भगिनी तसेच न्यायालयीन कमँचारी यानी आपला सहभाग नोंदवला.

या सर्व मोहिमेला पिंपरी बार चे सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील वकील बंधू भगिनींनीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा,प्रतिसाद दिला. ह्या लसिकरणाला पाठपुरावा अध्यक्ष अँड. गोरखनाथ झोळ व अँड बार कौन्सिल चे शिस्तपालन समितीचे माजी सदस्य अँड. अतिश लांडगे, माजी अध्यक्ष अँड. संजय दातीर पाटील, माजी अध्यक्ष अँड. सुशील मंचरकर, माजी अध्यक्ष अँड. दिनकर बारणे, माजी अध्यक्ष अँड. सुभाष चिंचवडे यांनी केला. खजिनदार अँड. हरिश भोसुरे व अँड. पांडूरंग शिनगारे यांनी पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व कायदा अधिकारी इंदलकर साहेब यांना भेटून लसीकरण देण्यासंबंधी प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले होते. पिंपरी चिंचवड मधील आत्ता पर्यंत 12 वकिलांचे करोना ने मृत्यू झाला आहे.तसेच पिंपरी न्यायालयातील 200 ते 300 वकील करीना ने बाधित होते.लसीकरण वकिलांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते .

लसीकरण ठिकाणी न्यायधिश सुपेकर साहेब व न्यायधिश पठाण साहेब यांनी भेट देऊन वकिलांना लसीकरणसाठी प्रोत्साहित केले.यावेळी उपस्थित PCABA 2021 चे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे,सचिव महेश टेमगीरे, खजिनदार ॲड हरिष भोसुरे, ॲाडिटर ॲड धनंजय कोकणे , सदस्य ॲड अमित गायकवाड, ॲड मंगेश नढे , ॲड प्राची शितोळे. ॲड कृष्णा वाघमारे,पिंपरी चिंचवड अँड बार असोसिएशनच्या सर्व कार्यकारणीच्या वतीने सर्व वकील बंधू भगिनींचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button