breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलातच मुकेश खन्ना म्हणाले..

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला.

नुकताच मुकेश खन्ना यांनी आजतकला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘हे केव्हाच व्हायला हवे होते. मला असे वाटते की सोशल मीडियामुळे अक्षय कुमार आणि त्याच्या टीमला असे करावे लागले असणार. यापुढे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटाचे नाव ठेवताना थोडा विचार करतील. आता सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे हे सर्वांना कळाले आहे’ असे म्हणत मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर लक्ष्मी बॉम्बचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या नावावर टीका केली होती. ‘या चित्रपटाचे शिर्षक लक्ष्मी बॉम्ब ठेवण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती का? माझ्या मते अजीबात नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता का? नाही ना. मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवले?’ असे म्हटले होते. आता चित्रपटाचे नाव बदलताच त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button