पिंपरी / चिंचवड

संभाजीनगर येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

संभाजीनगर, चिंचवड येथे दोन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवरून पतीसोबत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वानऊ वाजता घडली.

विनोद सोपान चिकणे (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी स्वाती मंगळवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी येत असताना संभाजीनगर मधील रामेश्वर मंदिराजवळ एका केटीएम दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button