पिंपरी / चिंचवड

नागरिकांना चांगली वागणूक देणा-या चार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा सत्कार

पिंपरी l प्रतिनिधी

नागरिकांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेवा एप हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या आधारे कोणते पोलीस अधिकारी, कर्मचारी नागरिकांना कशी वागणूक देतात ही पाहिले जाते. नागरिकांना येणारे अनुभव आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांनी डमी तक्रार देऊन घेतला. यामध्ये चार ठिकाणी पोलिसांना चांगला अनुभव आला. नागरिकांना योग्य वागणूक आणि सेवा देणा-या चार पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

हिंजवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, चाकणचे पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे, निगडीचे पोलीस शिपाई वाघमारे, पिंपरीचे पोलीस शिपाई लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाणे, चौकी येथे तक्रार देण्यासाठी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पोलिसांकडून येणारा अनुभव आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी 5 फेब्रुवारी 2021 पासून सेवा एप प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. सामान्य नागरिक, तक्रारदार हे पोलीस ठाण्यात अथवा चौकीला गेल्यावर त्यांना कशी वागणूक मिळते याबाबत आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

पोलीस नागरिकांना कशी वागणूक देतात हे पाहण्यासाठी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांनी 2, 3, 4 मार्च रोजी डमी तक्रार पोलीस ठाण्यात पाठवली. त्या तक्रारीवर पोलिसांनी कशी प्रतिक्रिया दिली. आलेल्या तक्रारीवर किती गांभीर्याने कार्यवाही केली, या सर्व बाबी जाणून घेण्यात आल्या. यामध्ये तक्रारदारांना चांगली वागणूक देणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button