breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील कोविड केअर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांची आयुक्तांकडे मागणी
  • अत्याचाराच्या घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोविड केअर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांच्या बाबतीत घडणा-या धक्कादायक घटणांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबई, भाईंदर, पनवेल, कोल्हापूर, पुणे अशा शहरातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडले आहेत. शासकीय यंत्रणा कार्यरत असताना अत्याचारासारखे प्रकार घडणे लांछनास्पद आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील सर्व कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य दिले पाहिजे. त्याठिकाणी कोरोनाबाधीत महिलांच्या सेवेसाठी महिला कर्मचारी आणि महिला सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या कोरोनाबाधीत पुरूष आणि महिलांना एकाच वॉर्डात दाखल केले जाते. त्यांच्यावर एकत्रीत उपचार केले जातात. मात्र, पुरुषांच्या समोर महिलांना तेथील वातावरण समाधानकारक वाटत नाही. कायम असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाईंदर येथील कोविड केअर सेंटरमध्ये विवाहित महिलेवर बाऊंसरने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यापूर्वी पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला. पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई याठिकाणी देखील छेडछाड आणि अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमधील महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याची खंत काटे यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी एकूण 3 हजार 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ही बाब सकारात्मक असली तरी आता ही कोविड सेंटर्स खासगी संस्थांना तीन महिन्यांसाठी चालवायला देण्यात येणार असून त्यासाठी महापालिका तब्बल 10 कोटी 12 लाख 23 हजार रुपये खर्च करत असल्याचे समजते. एवढा मोठा खर्च होत असेल तर त्याठिकाणी महिला रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधीत महिलांच्या सुरक्षेपोटी महापालिका हद्दीतील कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करणे गरजेचे. त्याठिकाणी महिला डॉक्टर्स, सिस्टर्स, महिला मदतनिसांसह सुरक्षारक्षक सुध्दा महिला कर्मचारीच देण्यात यावेत. जेणेकरून महिलांना असुरक्षित वाटणार नाही, असेही काटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सूचविले आहे.

महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून महिलांच्या सुरक्षेसाठी शिघ्र भूमिका घ्यावी. शक्य त्याठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड करावेत. शक्य नसेल त्याठिकाणी महिला कर्मचारी नेमावेत. अनेक ठिकाणी महिला कर्मचारी नसल्याच्या तक्रार आल्या आहेत. कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांना असुरक्षित वाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

संदीप काटे, युवा कार्यकर्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button