breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माझ्या नगरसदस्य पदाचे मानधन संरक्षण सहाय्यता निधी द्या – मयूर कलाटे

आयुक्त व नगरसचिव कार्यालयास दिले पत्र

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहीद जवानांच्या मुला-मुलीचे शिक्षण, त्याच्या आई-वडीलांचे आजारपण आणि त्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, याकरिता 1 मार्च 2019 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत या कालावधीतील दरमहा असलेले 15 हजार रुपये मानधन हे केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस देण्यात यावे, अशी मागणी नगरसदस्य मयूर कलाटे यांनी केली आहे. 

यासंर्दभात आयुक्त श्रावण हर्डिकर व नगरसचिक कार्यालयास पत्र दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त होत आहे. या आधीही दहशतवाद्यांनी कारगिल, पठाणकोट आणि उरी याठिकाणी केलेल्या चकमकीमध्ये भारतीय जवान शहीद झाले आहेत. या घटना घडल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळते. बंद पुकारले जातात, कॅंडल मार्च काढले जातात. शहीद जवानांच्या कुटूंबाबाबत संवेदना जाहीर करुन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले जाते.

केंद्राकडून व राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. तथापि ती पुरेशी नसते. तसेच त्या कुटुंबातील कर्तामाणूस गेल्यानंतर आर्थिकदृष्टया ते कुटुंब अडचणीत येते. काही दिवसानी आपण त्या कुटूंबाला विसरुन जातो.  दोन पाच वर्षानी त्या शहीदांच्या कुटुंबियांची काय अवस्था आहे याची जाणीव आपणाला राहत नाही. अनेकदा शहीदांच्या कुटुंबियांना फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागते, त्यांच्या मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आजारपण इत्यादी गोष्टींना त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यावेळी आपल्या जाणीव बोथट झालेल्या असतात. 

त्यामुळे देशासाठी आपले प्राण पणाला लावणा-या शहीद जवानांच्या कुटुंबियांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी, सामाजिक बांधिलकी जोपासत मी माहे 1 मार्च २०१९ पासून ते माझ्या नगरसदस्यपदाचा कालावधी फेब्रुवारी २०२२ पर्यंतचे मानधन केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस ( नॅशनल डिफेन्स फंड)  देण्यात यावे, अशी मागणी नगरसदस्य मयूर कलाटे यांनी केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button