breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वाईन फ्लूचा शहरात वाढतोय प्रादुर्भाव ; काळेवाडीतील रुग्णाचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी एका 43 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावल्याची ही तिसरा बळी आहे. 

काळेवाडी येथे राहणा-या 43 वर्षीय रुग्णाला 14 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने 15 ऑगस्ट रोजी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना सोमवारी (दि. 20) त्याचा तरुणाचा मृत्यू झाला. शहरात विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेले 7 रुग्ण सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आजवर 74 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती, त्यातील 63 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button