breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमच्या भुलतज्ज्ञ डाॅक्टरला सक्त ताकीद देताच घेतली स्वेच्छा निवृत्ती

आयुक्तांची कारवाईचा आदेश 

पिंपरी –  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया करताना कामकाजात हलगर्जीपणा केला. याबाबत महापालिका आयु्क्तांनी भुलतज्ज्ञ डाॅक्टरला सक्त ताकीद दिली. मात्र, संबंधित भुलतज्ज्ञ डाॅक्टरांनी सक्त ताकीद दिल्याचा आदेश दिल्यानंतर अवघ्या चार दिवसात स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. 

वायसीएमचे भुलतज्ज्ञ डॉ. राजेश भाऊसाहेब गोरे यांना  सक्त ताकीद देण्यात आली आहे.  रुग्ण बाळासाहेब देंडगे यांच्या पायावर 16 सप्टेंबर 2016 रोजी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाल्याने पायाला गँगरिन झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे देंडगे यांचा  24 सप्टेंबरला पाय काढावा लागला होता. भुलतज्ज्ञ डॉ. राजेश गोरे आणि परिचारिका जयश्री कुंभार यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली.

यामध्ये शस्त्रक्रियेचा कालावधी वाढल्याने, रुग्णाला स्थिर ठेवणे व शुद्धीत आणण्यासाठी डॉ. भाऊसाहेब गोरे यांनी प्रयत्न केले. मात्र, शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्यानंतर रुग्णाचा फिटनेस व टू डी इकोच्या आवश्‍यक्तेबद्दल सिनिअर फिजीशियन रिव्हीव्ह यांनी नोटीस लिहून स्वाक्षरी करणे आवश्‍यक होते. मात्र, डॉ. गोरे यांनी ही खबरदारी घेतली नसल्याचे आढळून आले.

या प्रकरणी झालेल्या चौकशीत डॉ. गोरे हे अंशत: दोषी आढळले. मात्र वायसीएम रुग्णालयात ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिव्ह प्रोटोकॉल’  निश्‍चित केलेला नाही. त्यामुळे दोषमुक्त करण्याची मागणी डॉ. गोरे यांनी केली होती; मात्र या घटनेला डॉ. गोरे हे पूर्णत: जबाबदार नसून, अंशत: जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांना सक्त ताकीद देण्याची शिफारस विभागप्रमुखांनी केली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कामकाजात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत डॉ. गोरे यांना सक्त ताकीद देण्यात आली. तसेच भविष्यात कर्तव्यपालनामध्ये कसूर केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तर संबंधित परिचारिका जयश्री राजेंद्र कुंभार यांच्यावर कामकाजात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सक्त ताकीद देण्यात आली. तसेच या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे.

दरम्यान, भुलतज्ज्ञ डाॅ. राजेश गोरे हे महापालिकेच्या आस्थापनेवर एॅनेस्थिशियालाॅजिस्ट म्हणून 5 सप्टेंबर 1997 रोजी नोकरीवर रुजू झाले होते. त्यांनी आजपर्यत महापालिकेची वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. परंतू, रुग्ण देंडगेच्या पायावर शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा केल्याने त्याची खातेनिहाय चाैकशी होवून केवळ आयुक्तांनी सक्त ताकीद दिली. परंतू, आयुक्तांनी सक्त ताकीद देताच अवघ्या चार दिवसात त्यांना वैद्यकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.  त्यानूसार खातेनिहाय चाैकशी पुर्ण होताच त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button