ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी, वाकड, निगडीमधून साडेतीन किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड | हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापे मारून दोन कारवाया केल्या. तर ताथवडे येथे वाकड पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या तिन्ही कारवायांमध्ये तीन किलो 620 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेज चौकाजवळ वाकड पोलिसांनी गुरुवारी (दि. 9) दुपारी पावणे दोन वाजता कारवाई केली. त्यात जयेंद्र विश्वनाथ झेंडे (वय 27, रा. निगडी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी 20 हजार 540 रुपयांचा 790 ग्रॅम गांजा आणि 700 रुपये रोख रक्कम जप्त केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लासुंडीवस्ती, माण येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वा तीन वाजता कारवाई केली. त्यात पोलिसांनी 41 वर्षीय महिलेकडून 12 हजार 725 रुपये किमतीचा 509 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओटास्कीम येथे गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वापाच वाजता दुसरी कारवाई केली. त्या कारवाईमध्ये एका 32 वर्षीय महिलेकडून 58 हजार 25 रुपये किमतीचा दोन किलो 321 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button