TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘थोरांची ओळख-ऑडिओ बुक्स’साठी 82 लाख रुपये खर्चाचा विषय नामंजूर

पिंपरी चिंचवड | सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचे अवांतर मराठी वाचनाचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले आहे. वाचनापासून नवी पिढी दूर जाऊ नये, हा उद्देश डोळयासमोर ठेऊन महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑडिओ बुक्सव्दारे महापुरुषांची ओळख करुन देण्यात येणार होती. पण, हा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे.मराठी साहित्याचे भूषण मानले जाणारे संत साहित्यातील ग्रंथ तसेच स्वामी विवेकानंद , स्वातंत्र्यवीर सावरकर , महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे मूळ लेखन नवीन पिढीच्या वाचनात येण्याची शक्यता सध्या दुरावली आहे.त्यावर एक परिणामकारक उपाय म्हणून पन्नालाल म्युझिक कंपनीच्या ‘पुस्तकवाणी’ या ऑडिओ बुक्स प्रकाशित करणा-या प्रकाशनातर्फे पुढाकार घेत शालेय सांस्कृतिक उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडक 135 चरित्रांची ‘थोरांची ओळख ‘ ‘राष्ट्रीय चरित्रमाला’ ही प्रत्येकी 40 मिनिटांची ‘लेक्चर सिरीज’ आणि ‘शालेय मूल्यसंस्कार श्रवण महासंच’ हा एकूण 70 विस्तृत ऑडिओ बुक्स असा एकूण 205 ऑडिओ बुक्सचा हा प्रस्तावित संच प्रत्येक शाळेच्या डिजिटल लायब्ररीसाठी घेतला जाणार होता. या संचात समाविष्ट ऑडिओ बुक्सची निवड चरित्र , चारित्र्य आणि व्यक्तिमत्व विकास या त्रिसूत्रीनुसार करण्यात आली होती. आहे.

ऑडिओ बुक्ससाठी प्रत्येक शाळेनिहाय 75 हजार 15 रुपये इतका खर्च येणार होता. महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांसाठी घेण्यात येणा-या ऑडिओ बुक्ससाठी एकूण 82 लाख 51 हजार 650 रुपये इतका खर्च करण्यात येणार होता. याबाबतच्या प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button