breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या

वाढदिवसाला भेटवस्तू नको, गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणा; हेमंत रासने यांचा कौतुकास्पद उपक्रम

पुणे | ‘वाढदिवसाला भेटवस्तू नको, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा’, असा कौतुकास्पद उपक्रम माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि कसबा विधानसभा निवडणुकीचे प्रमुख हेमंत रासने यांनी राबवला. त्यांच्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३०,००० वह्या संकलित झाल्या आहेत. आता या वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटल्या जाणार आहेत.

भाजपा नेते हेमंत रासने हे समाजकारणात कायम प्रमाणात सक्रिय असतात. कसबा विधानसभा मतदारसंघातील कोणताही प्रश्न सोडण्यासाठी ते सर्वात पुढे असतात. १३ एप्रिल रोजी, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी भेटवस्तूऐवजी वही भेट देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ३०,००० वह्या जमा झाल्या आहेत. त्यासाठी हेमंत रासनेंनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या क्षणी ते भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. तर यावेळी हेमंत रासने यांच्या हस्ते रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा   –    धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला!

Hemant Rasane

“माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या व्यक्त केलेल्या सर्व शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. कोणतीही भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या आणण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी तब्बल ३०,००० वह्या संकलित केल्या. हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण असून या वह्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच मदतीला येतील. आपणा सर्वांचे पुन:श्च एकदा आभार मानतो आणि आपले प्रेम, स्नेह असाच कायम रहावा हीच सदिच्छा व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान हेमंत रासने यांनी आपल्या जन्मदिनाची शुभ सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मार्फत वाढदिवसाच्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते हेमंत रासने यांचा सत्कार देखील करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button