breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पत्नीचा छळ करणा-या गोल्डमॅन सनी वाघचौरेला जामीन

पिंपरी |महाईन्यूज|

पत्नीचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नेहरुनगर (पिंपरी) गोल्डमॅनला न्यायालयाने जामीन मंजुर केला. सत्र न्यायाधीश आर.यु. मालवणकर यांनी 25 हजाराच्या जातमुचलक्‍यावर देत आदेश दिला.

सनी बाबा वाघचौरे (वय 31, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे त्या गोल्डमॅनचे नाव आहे. त्याने ऍड. सुभाष हुल्याळकर यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केला. सनी विरोधात पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनीसह त्याची आई, वडील आणि बहिणीवर गुन्हा दाखल आहे.

23 मार्च 2011 पासून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लग्न झाल्यापासून चौघांनी मिळून फिर्यादींना त्रास दिला. तिच्या आई-वडिलांकडून गृहोपयोगी वस्तु मागून घेतल्या. बाहेरील स्त्रियांशी संबंध ठेवून त्याने फिर्यादींना मारहाण केली. औषधे देऊन गर्भभात करून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणत त्याने न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. सुभाष हुल्याळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.

दरम्यान, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, असा गुन्हा पुन्हा न करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय न्यायक्षेत्र न सोडणे, सोमवारी सकाळी 10.30 ते 2 या वेळेत आणि तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, न्यायालयाच्या सुनावणीला हजर राहणे या आणि अशा अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button