breaking-newsताज्या घडामोडी

मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन : रोहित पवार

अहमदनगर | “जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचे सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करत आहे, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही”, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कर्जत-जामखेडमधील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर टीव्ही 9 सोबत बोलताना रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “बोलणारे बोलत असतात मात्र मी सामाजिक आणि व्यावसायिक कामं करतो. तेव्हा लोकांची इच्छा असते काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. मात्र अशी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल. परंतु पदाची अपेक्षा न ठेवता मी काम करत आहे”, असे रोहित पवार यांनी सांगितले.

तुम्हाला मंत्री आणि जिल्ह्याच पालकमंत्री व्हायला आवडेल असा प्रश्न विचारल्यानंतर रोहित पवार म्हणाले, “आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पार्टी व्यक्तिगत चालत नसते त्यात अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यात अनेक समीकरणे असतात त्यात मला किती वाटलं मला संधी द्यावी आणि जर संधी दिली तर मी त्याच सोन करेल. मात्र इतरही आमदार महत्वाचे असून या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button