breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, जेव्हा पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो’; भाजपा आमदाराचं विधान चर्चेत

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप, खळबळजनक विधाने बाहेर येऊ लागली आहेत. यातच भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भर सभेत मंत्रालयातील पैशांबाबत वक्तव्य केलं आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो, दणदणाट पैसे वाटतो, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सर्व सहकारी मंत्री यांच्याकडे मंत्रालयातील तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरीच्या चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो, दणदणाट पैसे वाटतो. एखाद्याने गावाने निधी मागितला, तर मी नाही म्हणतच नाही कधी.

हेही वाचा     –    एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या 

दरम्यान, मंगेश चव्हाणांच्या या वादग्रस्त विधानावरून सरकारकडून दखल घेतली जाते का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, लोकांच्या करातून आलेला पैसा जर अशापद्धतीने वाटला जात असेल तर मंत्रालयातील तिजोरी सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button