breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: IndiGo च्या कर्मचाऱ्यांना दिलासा; कंपनीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी गुरूवारी कर्मचाऱ्यांना दिली. सरकारनं यापूर्वी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच धर्तीवर कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीच्या कार्यकारी समितीतील सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छेनुसार या महिन्यात वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचं एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.