breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

शिवम दुबे अंजुम खान सोबत लग्नाच्या बंधनात

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे लग्नाच्या बंधनात अडकलाय. शिवम दुबे याने गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड अंजुम खान सोबत लग्नगाठ बांधली. तर शुक्रवारी त्याने लग्न केल्याचे ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. त्याने तीन फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची बातमी दिली आहे.

त्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. शिवम दुबेने मुस्लिम पद्धतीने लग्न केले. त्याने पत्नी अंजुम खान सोबत नमाज अदा केली.एका फोटोत दोघे निकाह वाचताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत तो पत्नी अंजुमला अंगठी घालत आहे. आणखी एक फोटो स्टेजवरचा आहे. शिवम आणि अंजुम खान खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

शिवम दुबेने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत म्हटले आहे की ‘आम्ही प्रेमापेक्षा जास्त प्रेम केलं…आणि येथून आमची सुरुवात होते. जस्ट मॅरिड 16-07-2021’

शिवम दुबेला क्रिकेटर श्रेयस अय्यरने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुबे आणि अय्यर दोघेही मुंबई रणजी टीमकडून खेळतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button